उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर भरकटले

| नागपूर | वृत्तसंस्था |

नागपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि पार्थ पवार सुद्धा सोबत होते. नागपूर ते गडचिरोली हेलिकॅाप्टर प्रवासात ही घटना घडली आहे. सुदैवाने सर्व जण बचावले आहे. खराब हवामानामुळे हेलिकॅाप्टर पावसाळी ढगात भरकटले होते. खराब हवामानामुळे दृष्यमानता अत्यंत कमी झाली होती. पण हेलिकॅाप्टर पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॅाप्टर जमिनीवर उतरवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Exit mobile version