बंद्यांची त्वचारोग तपासणी

अलिबागमधील जिल्हा कारागृहात उपक्रम

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

कारागागृहातील बंद्याचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी जिल्हा कारागृहाने पुढाकार घेतला आहे. मुंबईतील समता फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत बंद्यासाठी त्वचारोग तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरातून बंद्याच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना मोलाचे मार्गदर्शन तज्ज्ञांकडून करण्यात आले.
कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक तथा महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

या शिबिराचे उद्घाटन जिल्हा कारागृह अधीक्षक विशाल बांदल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. सुयश विरकर, डॉ. निशीगंधा माळी, सतीश जुंबळे, सोमनिग कांबळे आदी जिल्हा कारागृहातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सुरुवातीला सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी शिबिराचे महत्त्व पटवून देत असताना आरोग्याची काळजी कशा पद्धतीने घ्यायची याची माहिती दिली. या आरोग्य शिबिरात डॉ. सुयश विरकर (त्वचारोगतज्ज्ञ) यांनी बंद्यांना त्वचारोगाची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली. मुंबईतील समता फाऊंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत, अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्वचारोग तपासणी करण्यात आली. यावेळी मोफत औषध पुरवठा करण्यात आला.

Exit mobile version