। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागमधील जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले. बंद्यासाठी त्वचारोग निदान व त्यावरील उपचाराबाबत मार्गदर्शन तज्ञांकडून करण्यात आले. या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
कारागृह व सुधार सेवा विभागातील अपर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, दक्षिण विभाग मुंबईतील कारागृह उपमहानिरीक्षक, धर्मदाय सहाय्यक आयुक्त, धर्मादाय आयुक्तालय सूनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच, अलिबागमधील जिल्हा कारागृह अधीक्षक यांच्या पुढाकाराने बंद्यासाठी त्वचारोग तपासणी शिबीर घेण्यात आले. जिल्हा कारागृहातील 28हून अधिक बंद्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. दरम्यान कारागृह अधीक्षक अशोक कारकर यांनी आरोग्य व स्वच्छतेबाबत काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी कारागृहातील तुरुंगाधिकारी, व इतर कर्मचारी यांनी प्रचंड मेहनत घेतली. सुरक्षेबाबत विशेष दक्षता घेऊन हे शिबीर शांततामय वातावरणा पार पाडले.