कर्नाटकात शिवपुतळ्याची विटंबना

महाराष्ट्रात तीव्र पडसाद
मुंबई | प्रतिनिधी |
कर्नाटकातील बंगळुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली.याबाबतचा व्हीडीओ सर्वत्र व्हायलर होताच त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात सर्वत्र उमटले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत बंगळूरमधील समाजकंटकावर कडक कारवाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक सरकारला कडक कारवाईचे आदेश द्यावेत,अशी मागणी केलेली आहे.
बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत अघटीत घडले आहे, तर त्याची कसून चौकशी करायलाच हवी. या प्रकाराकडे डोळेझाक करू नका, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, गेले कित्येक वर्ष कर्नाटकमधील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे. आता तर शिवरायांसारख्या आपल्याआराध्य दैवताची विटंबना करण्याची घटना घडते. तेथील सरकार याकडे डोळेझाक करते, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.
नुकतेच वाराणसीत काशी विश्‍वेश्‍वराच्या मंदिरात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात, देशाची संस्कृती चिरडण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी राजे निर्माण झाले असे कौतुकोद्गार काढले होते. या कार्यक्रमास काही दिवस झाले नाही तोच, भाजपशासित कर्नाटकात याच शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना होते. या प्रकरणी कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे. हे अतिशय निंदनीय आणि अवमानकारक असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.

Exit mobile version