उरणमध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान

 | उरण | वार्ताहर |

महाराष्ट्र शासन मत्स्य व्यवसाय आय.एन.डी ( एमएच-3-एमएम-4266) ही ग्रस्ती नौका उरण तालुक्यातील करंजा मच्छीमार बंदरात फाटलेल्या अवस्थेत देशाचा राष्ट्रध्वज (तिरंगा झेंडा) लावून फेरफटका मारत आहे. पर्यायाने हा देशाचा, राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. तरी संबंधित घटनेचे गांभीर्य ओळखून सदर ग्रस्ती नौके वरील अधिकारी, कर्मचारी वर्गावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कोकण विभाग फिशरमेन काँग्रेस अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे तसेच  मुख्यमंत्री,  पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Exit mobile version