तळा येथील देशमुख वाचनालय पुन्हा सुरु होणार

| तळा | वार्ताहर |

तळा येथील बंद पडलेले द.रा.देशमुख वाचनालय पुन्हा सुरु करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. हे 1992 पासून सुरू करण्यात आले होते. भावी पिढीला वाचन संस्कृती वाढीस लागावी या उदात्त हेतूने किरण शेट देशमुख यांनी पिताजीच्या नावाने स्थापना केली. गेले काही वर्ष हे वाचन मंदिर शासनाच्या निकषामुळे त्याचे मान्यता काढून घेण्यात आली होती. परंतु शासनाच्या आदेशामुळे तरुण पिढींमध्ये वाचनाची जनजागृती व्हावी व बौद्धिक क्षमतावाढावी या उद्देशाने रायगड जिल्ह्यातील बंद पडलेली वाचनालये पुन्हा सुरु व्हावीत यासाठी रायगड जिल्हा ग्रंथालयाने पुढाकार घेतला आहे.

ग्रंथालयाचे अध्यक्ष संजय कोपर्डे यांनी तळा येथे घेतलेल्या सभेमध्ये अत्याधुनिक पद्धतीचे सर्वांना मध्यवर्ती ठिकाणी साहित्य, ऐतिहासिक लेख, दैनिक, वाचायला मिळतील व विद्यार्थी तरुण पिढी व ज्येष्ठ नागरिक यांना एकाच ठिकाणी सगळे वाचता येईल या दृष्टिकोनातून चालू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या सभेला म्हसळा वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, श्रीवर्धनचे गोगटे, रोहा येथील रवींद्र तावडे, संजय कोपर्डे, वाचनालयाचे संस्थापक किरण देशमुख अध्यक्ष डॉ. सतीश वडके, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, महेंद्र कजबजे, मुंतुंगे, डॉ. विभावरी देशमुख, ऋता देशमुख, हृदय रेडीज, अश्‍विनी कानिटकर उपस्थित होते.

यावेळी वाचकांनी मनोगतात वाचनालयाची नितांत गरज असून तरूण पिढी वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. वाचनाने जनरल नॉलेज वाढण्यास मदत होते. त्याबरोबर धार्मिक,ऐतीहासिक,सामाजिक, साहित्यिक माहिती, इतिहासाची माहिती होते.यामुळे भावी पिढीचा मोबाईलवापर कमी होण्यास मदत होईल असे मत व्यक्त केल. यावेळी ग्रंथपाल मनोज वाढवळ , नितेश मुळे यांच्या विशेष मार्गदर्शनानंतर सहकार्य करण्याचे मान्य केले असून लागेल ती मदत केली जाईल, असे आश्‍वासन नगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी दिले आभार प्रदर्शन मुतुंगे यांनी केले

Exit mobile version