| मुंबई | प्रतिनिधी |
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. ही कार्यवाही सोमवारी करण्यात आली. मात्र अनिल देशमुख हे तुरुंगात पडलेले असल्याने त्यांना जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. देशमुख यांचा मुक्काम सध्या ऑर्थर रोड तर वाझेचा मुक्काम तळोजा कारागृहात आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) विशेष न्यायालयाने देशमुख, पालांडे आणि शिंदे या तिघांना आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेण्याची परवानगी सीबीआयला दिली. तसेच शुक्रवारीच विशेष राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) न्यायालयाने सीबीआयला तळोजा कारागृहात असलेले मुंबईचे बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला ताब्यात घेण्याची परवानगी दिली.