साडेतीनशे धावा करूनही महाराष्ट्राची सलामीला हार

| जयपूर | वृत्तसंस्था |

तब्बल 355 धावांचा डोंगर उभा करूनही महाराष्ट्राला विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत झारखंडकडून पराभव सहन करावा लागला. विराट सिंगची झंझावाती 143 धावांची खेळी महाराष्ट्राच्या प्रयत्नांवर पाणी फेरणारी ठरली. विशेष म्हणजे झारखंडने विजयाचे 356 धावांचे आव्हान दोन षटके राखून पार केले. 2 बाद 17 अशा अवस्थेनंतर झारखंडने ही विजयी झेप घेतली. प्रथम फलंदाजीत महाराष्ट्राने 355 धावा केल्यावर त्यांचा विजय सोपा वाटत होता; परंतु चित्र बदलत गेले.

महाराष्ट्राकडून अंकित बावणेने नाबाद 107 धावा केल्या; परंतु त्यासाठी त्याने 100 चेंडू घेतले. याच वेळी प्रतिस्पर्धी झारखंड संघातील विराट सिंगने 116 चेंडूत 143 धावांची खेळी साकार केली. दोन्ही संघातील हा फरक निर्णायक ठरला. महाराष्ट्राकडून ओम भोसलेने 71 चेंडूत 73, केदार जाधव 50 चेंडूत 55 यांनी अर्धशतके केली असली, तरी त्यांचा स्ट्राईक रेट मोठा नव्हता.
संक्षिप्त धावफलक – महाराष्ट्र 50 षटकांत 4 बाद 355 ( ओम भोसले 73 – 71 चेंडू, 12 चौकार, 1 षटकार, नौशाद शेख 32, केदार जाधव 55 – 50 चेंडू, 7 चौकार, अंकित बावणे नाबाद 107 – 100 चेंडू, 8 चौकार, 3 षटकार, अझिम काझी 61 – 41 चेंडू, 5 चौकार, 4 षटकार, अवांतर 24, वरुण ॲरॉन 52-2, शाबाझ नदीम 71-1)पराभूत वि. झारखंड – 48 षटकांत 4 बाद 359 (विराट सिंग 143 – 116 चेंडू, 16 चौकार, 4 षटकार, विनायक विक्रम 53, सौरभ तिवारी नाबाद 70 – 64 चेंडू, 6 चौकार, 2 षटकार, कुमार कुशाग्रा नाबाद 67 – 36 चेंडू, 4 चौकार, 5 षटकार, प्रदीप दाधे 47-2, प्रशांत सोलंकी 69-2)

Exit mobile version