बांगलादेशावर विजय मिळवूनही टीम इंडियाची धाकधूक कायम

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतानं बांगलादेशवर 110 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी 230 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र बांगलादेशला सर्वबाद 119 धावाच करता आल्या. या विजयासह भारत गुणतातालिकेत तीन विजयांसह 6 गुण मिळत तिसर्‍या स्थानावर पोहचला आहे. भारताचा रनरेट +0.768 इतका आहे. भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना 27 मार्चला दक्षिण अफ्रिकेसोबत असणार आहे.

बांगलादेशचा डाव
भारताच्या गोलंदाजीसमोर बांगलादेशचा एकही फलंदाज तग धरु शकला नाही. एका मागे एक असे करत सर्वच खेळाडू तंबूत परतले. शरमीन अक्तर (5), मुर्शिदा खातुन (19), फरगाना होक (0), निगर सुलताना (3), रुमाना अहमद (2), रितु मोनी (16), लता मोंडल (24), सलमा खातुन (32), नहिदा अक्तर(0), फहिमा खातुन (0) अशा धावा करून फलंदाज बाद झाले. जहानारा आलम (11) या धावसंख्येवर नाबाद राहिली. भारताकडून स्नेह राणाने 10 षटकात 30 धावा देऊन 4 गडी बाद केले. यात दोन षटकं निर्धाव होती. तर झुलन गोस्वामी आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर राजेश्‍वरी गायकवाड आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. करो या मरोच्या सामन्यात स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माने दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 74 धावांची भागीदारी केली. मात्र 30 या वैयक्तिक धावसंख्येवर असताना स्मृती मंधाना नहिदा अक्तरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. त्यानंतर 42 धावा करून शेफाली वर्षी यष्टीचीत झाली आणि तंबूत परतली. त्यानंतर आलेल्या यस्तिका भाटीयाला हवी तशी साथ मिळाली नाही. मात्र एका बाजूला तिथे संघाचा डाव सावरून धरला. मिताली राज (0), हरमनप्रीत कौर (14), रिचा घोष (26) धावा करून बाद झाले. यस्तिका भाटियाने 80 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. मात्र अर्धशतक झलकवल्यानंतर रितू मोनीच्या गोलंदाजीवर नहिदा अक्तरने तिचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला.
कसं आहे उपांत्य फेरीचं गणित?
भारताने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यात तीनमध्ये विजय, तर तीनमध्ये पराभवाचं तोंड पहिलं आहे. असं असलं तरी भारताचा रनरेट चांगला आहे. +0.768 असा रनरेट आहे. त्यामुळे रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीची दारं अजून खुली आहे. मात्र असं असलं तरी शेवटचा सामना दक्षिण अफ्रिकेसोबत आहे. हा सामना जिंकल्यास भारताला उपांत्य फेरीत जाणं शक्य होईल. पाकिस्तानने आपले उर्वरित दोन्ही सामने म्हणजेच इंग्लंड आणि न्यूझीलंडला चांगल्या फरकाने हरवलं. दुसरीकडे, भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यास उपांत्य गाठण्याच्या भारताच्या आशा कायम राहतील. जरी भारत दक्षिण आफ्रिकेकडून हरला आणि पाकिस्तानने दोन्ही सामने जिंकले तर चांगल्या नेट रनरेटमुळे भारत पुढे असेल आणि उपांत्य फेरी गाठू शकेल.

Exit mobile version