| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सर्व विरोध व जनमानस डावलून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पाशवी बहुमताच्या जोरावर जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आले. हा कायदा लोकशाही तत्त्वांना बाधा आणणारा आणि सत्ताधारी प्रशासनाला जास्त अधिकार प्रदान करून नागरिकांच्या हक्कांची गळचेपी करणारा आहे. या विधेयकाविरोधात महाविकास आघाडीच्यावतीने राज्यभर निर्धार आंदोलन बुधवारी (दि.10) करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन केले जाणार आहे.
या विधेयकाला प्रत्यक्ष व दिलेल्या संकेतस्थळावर सूचना व विरोध नोंदवण्यात आला. राज्यभरातून 13 हजार हरकती दाखल करण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी 9500 हरकती सदर विधेयक रद्द करा, हे स्पष्ट मांडणाऱ्या होत्या. सर्व हरकतींची दखल न घेता, हा कायदा पुढे रेटण्यात आला. सर्व विरोध व जनमानस डावलून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पाशवी बहुमताच्या जोरावर सदर कायदा मंजूर करण्यात आला.
हा कायदा लोकशाही तत्त्वांना बाधा आणणारा आणि सत्ताधारी प्रशासनाला जास्त अधिकार प्रदान करून नागरिकांच्या हक्कांची, सरकारला लोकशाही मार्गाने जाब विचारणाऱ्यांची गळचेपी करणारा आहे. या कायद्याच्या विरोधात राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. तालुका, जिल्हा शहर स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जमून या कायद्याचा निषेध करण्यात येईल, सरकारला विरोधाचा असहकार आंदोलनाचा इशारा देण्यात येणार आहे. समाजात या जुलमी कायद्याची माहिती पोहोचावी, असा या आंदोलनाचा उद्देश आहे.
जनसुरक्षा विधेयकाविरोधात उद्या निर्धार आंदोलन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606