पेन्शन वाढीसाठी लढण्याचा निर्धार

सेवानिवृत्त संघटनांची बैठक
। माणगाव । प्रतिनिधी ।
शेगाव येथे झालेल्या चिंतन बैठकीत इपीएफ पेन्शन वाढीचा लढा परिणामकारक रीतीने पुढे नेण्यासाठी देश भरातील संघटनांची एकजूट उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच या एकजुटीच्या माध्यमातून सरकारच्या पेन्शनवर विरोधी धोरणाचा तीव्र संघर्ष करण्याचा विचार पुढे आला.तसेच इपीएफ पेन्शनरांच्या हितासाठी देशभरातील इपीएफ पेन्शनर संघटना एकजुटीत सहभागी होण्याचे आवाहन शेगाव येथे चिंतन बैठकीत करण्यात आले.या बैठकीला रायगडातील संघटनांचे पदाधिकारी सहभागी झालेले होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील पेन्शन चळवळीतील जेष्ठ नेते देवराव पाटील हे होते.सभेमध्ये प्रकाश येंडे, अतुल दिघे, प्रकाश पाठक,एम.आर.जाधव,भीमराव डोंगरे,सुभाष कुलकर्णी,पुंडलिक पांडे यांनी विचार व्यक्त केले.चर्च मध्ये बाबुराव दळवी,सर्जेराव दहिफळे,व्ही.एम.पतंगराव,गोपाळ मांडेकर,यांनी हि सहभाग घेतला.या प्रसंगी आर.जी.देशमुख, डी. एम. पंत,वासुदेव हांडे,प्रकाश दामले आदी उपस्थित होते.रायगड औद्योगिक पेन्शनर व वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष बाळकृष्ण सोपान अंबुर्ले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
केंद्र सरकारने गेल्या 8 वर्षात पेन्शनरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.इतकेच नव्हे तर पेन्शन वाढू नये यासाठी केंद्रातील मोदी नेतृत्वातील भाजपा सरकार प्रयत्न करते असे अनुभवास येत आहे.अच्छे दिनचा वादा केलेल्या या सरकारकडून देश भरतील पेन्शनर संघटनांचा भ्रमनिरास झाला आहे हे बैठकीतून स्पष्ट झाले आहे.
दुसर्‍या बाजूला पेन्शन संघर्षाला बोथट करण्यासाठी युट्युब व्हाट्स अँप,वर्तमान पत्रे व मीडिया द्वारे चुकीचे संदेश देऊन सरकारला मदत करण्याची भूमिका काही मंडळी पार पडताना दिसत आहेत याचीही नोंद घेण्यात आली.सरकारची भूमिका व माध्यमांकडून चाललेली फसवणूक इपीएफ पेंन्शनरांपर्यंत प्रकर्षाने मांडून त्यांना लढ्यासाठी तयार करण्याचा निर्णय करण्यात आला.संघर्षानंतरही हा प्रश्‍न सोडवण्यासाठी राज्यकर्ते तयार झाले नाहीत तर निवडणुकीत सुद्धा याबाबत काही निर्णय करावा लागला तर तो करावा असा विचार देखील सभेत झाला.

Exit mobile version