प्रधान कौशल्य दौड! पुरुषांमध्ये देवानंद,महिलांमध्ये ॠतुजाची बाजी

| पेण | प्रतिनिधी |
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पेणने केंद्र शासनाच्या सुचनेनुसार कौशल्य दौड मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी शेकडो तरुणांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रीतम पाटील व मुख्यध्यापिका विद्या पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. या मॅरेथॉनसाठी पाच किलोमीटरचे अंतर निश्चित करण्यात आले होते. या स्पर्धेत पुरुषांमध्ये देवानंद पाटील याने, तर महिलांमध्ये ॠतुजा सकपाळने बाजी मारली आहे.

पेण औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या पटागंणातून प्रारंभ झालेल्या या स्पर्धेत पुरूष गटामध्ये स्वराज देवानंद पाटील याने 12 मिनीट 25 सेकंदांमध्ये अंतर पार करून प्रथम, महादेव गजानन कोळेकरने 12 मिनीट 53 सेकंद द्वितीय, तर अभिनंदन दिपक सूर्यवंशी याने 12 मिनीट 55 सेकंदामध्ये अंतर पार करून तृतीय क्रमांक पटकविला. तर महिला गटामध्ये ॠतुजा जयंत सकपाळ हिने 15 मिनीट 33 सेकंदामध्ये अंतर पार पाडून प्रथम, सावली सखाराम गोरे 16 मिनीट 26 सेकंद द्वितीय, तर तन्वी संजय मरागजे 17 मिनीट 24 सेकंदात अंतर पार करून तृतीय क्रमांक पटकविला. विजेत्यांना रोख रक्कम आणि प्रशस्ती पत्र देण्यात आले.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण नगराध्यक्षा प्रीतम पाटील, आयटीआय मुख्याध्यापिका विद्या पाटील, नगरसेवक संतोष पाटील, तेजस मनकावळे, महिला पोलीस उपनिरीक्षक मनाली घाडगे, ए.ए. डोंगरदिवे यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संदानशिव पी.पी., जोशी एच.एस., डोणे पी.एम., व्ही.डी. साळवी, एन.डी. लोंढे, एस.व्ही. बेंडकुळे, एस.पी. झेमसे, एम.व्ही. पाटील, के.एस. भगत, एस.एस. गावंड आदी शिक्षकांनी मेहनत घेतली.

Exit mobile version