| दापोली | प्रतिनिधी |
दापोली येथे झालेल्या खुलागट 50 किलोमीटर सायकल शर्यतीमध्ये रायगड पेण येथील रोडे कश्मीरे येथील देवरशी पाटील याने उत्कृष्ट सायकल चालवून अटीतटीच्या लढतीमध्ये सर्व स्पर्धकांना मागे टाकून प्रथम क्रमांक मिळविला.
प्रथम क्रमांक देवरशी नरेश पाटील -पेण, द्वितीय क्रमांक आदित्य पाटील- सांगली, तृतीय क्रमांक खुदू वशिम शेख परभणी या स्पर्धेकांने पटकावला. सायकल शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्याचे वडील नरेश पाटील, काका- सदानंद पाटील, श्रीकांत पाटभ्ल आणि कुटूंबातील नातेवाईक, गावकरी मंडळीने अभिनंदन केले आहे.