अभ्यासाबरोबरच कलागुण विकसित करा

कोलटकर महाराजांचे विद्यार्थ्यांना आवाहन

| खांब | प्रतिनिधी |

शालेय जीवनात विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत असताना अभ्यासाबरोबरच कलागुण विकसित करा, असे आवाहन हभप रायगड भूषण डॉ. मारूती महाराज कोलाटकर यांनी विद्यार्थ्यांना केले.

रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे येथे साजरा होत असलेल्या शारदोत्सव कार्यक्रमात आपल्या प्रवचनरूपी सेवेप्रसंगी विद्यार्थी वर्गाला संबोधित करताना ते बोलत होते. तर पुढे त्यांनी आपल्या आई-वडीलांचे नाव उज्ज्वल करण्यासाठी व आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नसून अधिकाधिक शिक्षण घेऊन आपले स्वतःचे करिअर घडवायचे आहे. तसेच स्वतःच्या प्रगतीसाठी मोबाईलपासून आपण दूर राहिले पाहिजे व मोबाईलचे फायद्यापेक्षा तोटेच अधिक असल्याचे सांगितले. शिक्षणात अध्यात्मिक शक्तीला अधिक जोड दिली तर शिक्षण सहजसुलभ होईल, असेही शेवटी त्यांनी सांगितले.

Exit mobile version