| माणगाव । वार्ताहर ।
शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही खर्या अर्थाने करिअर करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज रवींद्र तांबे यांनी बामणोली येथील शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. श्री संत गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ बामणोली संचालित इंग्लिश स्कुल बामणोली ता.माणगाव या शाळेचा क्रीडा महोत्सव दि.29 व 30 डिसेंबर रोजी बामणोली येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी डॉ.सुनील मोहिते, रघुनाथ जगदाळे, सखाराम मुंढे, मुकुंद वाढवळ, अनिल पाखुर्डे, सचिन म्हसकर, वैभवी गुगळे, रिना शिर्के, आयुष मोहिते, स्वप्नील शिर्के, संभाजी गायकवाड आदींसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकाश खिडबिडे यांनी केले.