चौलमध्ये सायकल वाटप, ज्येष्ठांचा सत्कार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेकापक्ष हा वैशिष्टयपुर्ण काम करणारा पक्ष आहे. शेकापक्ष हा विकासाचा पक्ष आहे. या गावामध्ये आणि तालुक्यामध्ये जेवढी जेवढी विकासाची कामे केलेली आहेत ती सर्व शेकापक्षानेच केलेली आहेत. आमदारकीच्या जोरावरच आपण संपूर्ण सर्वांगिण विकास या तालुक्याचा केला असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.

चौल विभागीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आणि महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या संकल्पनेतून सावित्रीच्या लेकींना सायकल वाटप आणि ज्येष्ठ नागरिका सत्कार सोहळ्याचे आयोजन चौल पाठारे क्षत्रिय हॉल, चौलमळा येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शेकापक्षाचे जिल्हा चिटणीस अॅड आस्वाद पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी सभापती प्रमोद ठाकूर, सरोज वरसोलकर, माजी उपसभापती संदीप घरत, जयवंत नाईक, कल्पना म्हात्रे, नंदकुमार मयेकर, द.प. ठाकूर, नागावचे सरपंच निखील मयेकर, सदस्य हर्षदा मयेकर, चौल शहर चिटणीस अरविंद शिवलकर, अनन्या कोरडे, तालुका पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे आदी उपस्थित होते.
कोणीही मुख्यमंत्री आले तरी जयंत पाटील ठामपणे काम करत राहणार आहे.

यावेळी विविध क्षेत्रात काम केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच कोव्हीड योद्धा म्हणून आरोग्य सेवेत योगदान दिलेल्यांचाही सन्मान करण्यात आला.
आ. जयंत पाटील पुढे म्हणाले की, अष्टागरात शेकापक्षाचे प्रभावशाली क्षेत्र म्हणजे चौल होते.एकनिष्ठतेने आणि ध्येयाने काम करणार्या कार्यकर्त्यांची टिम चौलमध्ये आहे. अलिबाग तालुक्याने आम्हाला भरभरुन दिले आहे. आम्ही घेतलेली सर्व पदे तुमच्यामुळे घेतली त्यामुळे हा मान तुम्हाला आहे. प्रभावशाली काम तुमच्या आशिवार्दाने मीनाक्षी पाटील आणि मी केले असल्याचेही त्यांनी नमुद केले. या ठिकाणी रस्ते आहेत गल्ल्या क्राँकीट करायच्या आहेत. पालखी रस्त्याचे काम करायचे आहे. दोन तीन रस्ते चांगले करु असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

चौलकरांसाठी महत्वाच्या असलेल्या सांबरकुंड धरणाचे काम देखील आपण करत आहोत. मात्र भुसंपादनामुळे हे काम थांबलेले आहे. हे काम मार्गी लागल्यावर या सांबरकुंड धरणाचा लाभ चौल, रेवदंडा आणि नागावला होणार आहे. गोडे पाणी मिळणार आहे. दुपिकी होईलच परंतु वाड्यांमधले आपले पिक डबल होईल. त्यापद्धतीचे काम आपल्याला करायचे आहे. अशा पद्धतीचे चौल आपण उभं ठेवले होते ते पुन्हा उभे करु असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

चित्रलेखा पाटील यांचे सायकल वाटपाचे काम फार मोठे आहे. सायकल वाटप करताना माहिती घेऊन सर्व्हे करुन गरजू मुलींपर्यंतच सायकल पोहचविण्याचे काम केले जाते. हे वाटप करताना पक्ष देखील पाहिले जात नाही. चित्रलेखा पाटील यांच्या कामाचे जयंत पाटील यांनी कौतुक केले. सांप्रतच्या राजकीय परिस्थितीवर मी बोलत नाही. कोण कुठे आहे हे आपण सांगू शकत नाही. पण तुम्ही आम्ही 50 वर्षे शेकापक्षात ठामपणे आहोत. आपण सर्वजण एकाच पक्षात कायम राहिलो हेच आपले वैशिष्टय आहे. म्हणून जनतेमध्ये आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असल्याचे ते म्हणाले.

विकासाबाबत बोलताना जयंत पाटील यांनी आपण बैलखिंडीतून एक रस्ता आणतोय, पेझारीहुन बैलखिंडीतून येणार. बागमळ्याहून साताड बंदरात नेणार तिथून आपण रेवदंडा साळाव पुलावर नेणार. गेल्या अधिवेशनात साळावचा पुल देखील आपण मंजुर करुन घेतला आहे. नवीन पुल कोर्लई कडून करायचा विचार सुरु आहे. समुद्रकिनार्यावरचा सिआरझेड संपूर्णपणे उठणार आहे. रेवदंडा आणी चौल संपूर्ण अप होणार आहे. नागाव, आक्षी, थळ, वरसोली आणि सासवणे पर्यंतचा अष्टागरातला किनारा हा पर्यटनाच्या दृष्टीने वेगळा हब झालेला आहे. रेंवदडा देखील होऊ मागतो आहे. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याने वेगळी भुमीका घेऊन विकास करु. 60 वर्षांपासून चौल नाना पाटील यांच्या पाठीशी राहिला आहे. एक अतुट नाते पुन्हा घट्ट करण्याचे काम पुढील कालावधीत करायचे असल्याचेही शेवटी सांगितले.
रामाचा वावर असलेल्या चौलची उन्नती व्हावी
चौल हे रामाचे पाय लागलेली नगरी आहे. रामाचा तुम्ही नाव घेता. तो राम आमच्याकडे आहे. राम येथे वावरला त्याची उन्नती करा म्हणून खास बाब म्हणून चौलसाठी मागणी करतोय. चौल परिसरातील मंदिराचे एक वेगळे महत्व आहे. अधिवेशनात आवाज उठविणार आहे. या देवळांची रचना झाली पाहिजे, पुर्नबांधणी झाली पाहिजे. ज्याची मोडतोड झाली असेल त्याचीही दुरुस्ती झाली पाहिजे. पर्यटनातून तसेच देवळांच्या पुनर्वसासाठी वेगळे हेड आहे. त्याच्यातून नियोजन करु. या भागात अनेक देवळे आहेत. मोठा इतिहास आहे. तो आपल्याला पर्यटकांपर्यंत पोहचवायचा आहे.
चित्रलेखा ताई ठरल्या गरीबांच्या वाली
यावेळी रेवंदडा हायस्कूलचे संगीत शिक्षक विशाल महाडीक यांनी शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांच्यावर रचलेले शेकापक्षाची ही धुरा घेवूनी निघाली स्त्री शक्तीच्या रुपाने धावूनीया आली चित्रलेखा ताई ठरल्या गरीबांच्या वाली हे गीत सादर केले.