शेकापमुळे बामणगाव परिसराचा विकास

आ. जयंत पाटील यांचे प्रतिपादन
बामणगाव ते खुटळवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या प्रयत्नातून तालुक्यातील बामणगांव ते खुटळवाडी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून त्याचा शुभारंभ शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी तालुका चिटणीस अनिल शांताराम पाटील, अलिबाग पंचायत समितीचे माजी उपसभापती संदीप घरत, अविनाश ठाकूर, मारुती ठाकूर, नरेंद्र उले, काविर सरपंच राजेंद्र म्हात्रे, सरपंच ग्रामपंचायत सदस्य लंकेश नागावकर, संतोष मानकर, विजय कुंठे यांच्यासह आदी उपस्थित होते.

यावेळी आ. जयंत पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शेकापक्षाच्या माध्यमातून बामणगाव परिसराचा सर्वांगिण विकास केला जात आहे. गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. सदर रस्त्याचे काम आदिवासी ठाकूर वाडीपर्यंत करुन देणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केले. तरुणाईच्या कामाचे त्यांनी यावेळी आवर्जून कौतुक केले.

अलिबाग तालुक्याच्या विकासासाठी शेकापने नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. येथील जनतेला मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासनिधी आणून नियोजनबद्ध पद्धतीने विकास कामे करण्यावर आमचा नेहमीच भर राहिलेला आहे. यापुढेही हिच भूमिका कायम राहिल. – आ. जयंत पाटील

Exit mobile version