विज्ञान, अध्यात्म एकत्र आल्यास मानवतेचा विकास शक्य – डॉ.विजय भटकर

। पंढरपूर । प्रतिनिधी ।
विज्ञान आणि अध्यात्म यांचा एकञित प्रवास म्हणजे पुर्ण ज्ञान. पुर्ण ज्ञान हे अध्यात्माशिवाय अपुर्ण आहे. जागतिक शांतता आवश्यक असून हे विश्‍वची माझे घर ही संत ज्ञानेश्‍वर माऊलींची संकल्पना हि जगासाठी तारणारी असेल. मी स्वतः जग आणि माझ्यापेक्षा कोणीही वेगळे नाही हे मनामध्ये रुजणे आवश्यक आहे. आपल्या आयुष्याचा उददेश प्रत्येकांना उमगला पाहीजे. आर्टिफिशीयल इंटेलिजन्स् हे आता प्रत्यक्षात वापरले जात असून जगाचा प्रवास इमोशनल इंटेलिजन्स् या क्षेत्राकडे निघाला असल्याची माहिती पद्मभुषण शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग कॉलेज मधील आंतरराष्ट्रीय शोधनिंबध परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना दिली.

कोर्टी ता. पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात 25 व 26 जून 2021 या कालावधीत दोन आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदचे आयोजन करण्यात आले होते. या परिषद मध्ये अगदेर नार्वे विद्यापीठातील डॉ. मोहन कोल्हे, कॅश्यायू संघयु विद्यापीठ, जपान येथील डॉ. कोकी वोगुरा यांच्यासह अनेक नामवंत विद्यापीठातील शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. या परिषदेमध्ये विविध नामांकित विद्यापीठातील 250 हून अधिक शोधनिबंध सादर करण्यात आले. ही शोधनिबंध परिषद उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.या परिषदेचे उद्घाटन डॉ. विजय भाटकर यांच्या उपस्थितीत झाले. आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदमध्ये सहभागी झालेल्या मान्यवरांचे स्वागत स्वागतगीताने करण्यात आले. डॉ. कैलाश करांडे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख मनोगत केले. ही परिषद अभियांत्रिकी प्रणालीच्या संगणकीय बुध्दीमत्तेवर आंतरराष्ट्रीय शोधनिंबध परिषद तर अभियांत्रिकी प्रणालीसाठी माहिती तंत्रज्ञानामध्ये इंटेलिजंट कॉम्पुटिंग वर आंतरराष्ट्रीय शोधनिंबध परिषद अशा दोन आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद संपन्न झाल्या.

Exit mobile version