सामाजिक दायित्व फंडातून विकास

। पालघर । प्रतिनिधी ।

शिक्षण, आरोग्य व पर्यावरणाचा विकास करण्यासाठी सामाजिक दायित्व फंडातून (सीएसआर) निधी आणून त्या माध्यमातून शहराचा मूलभूत विकास व्हावा यासाठी भाईंदर महापालिकेने सीएसआर परिषदेचे ट्रान्सफॉरमिंग मीरा- भाईंदर 2047 चे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद बुधवार (दि.7) भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह येथे होणार आहे. हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणारी ही देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.

सीएसआर परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शहरातील विकासक व संस्था यांच्याशी होणार्‍या संवादातून प्रभावी उपक्रम राबवणे आणि मीरा भाईंदर शहराच्या भविष्याला आकार देण्यासाठी डायनॅमिक प्लॅटफॉर्म म्हणून काम करण्याचे आहे. या सीएसआर परिषदेमध्ये महापालिका पर्यावरण, शिक्षण आणि आरोग्य सेवा या मुख्य तीन विषयांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. विचारवंत नेते, उद्योग तज्ञ आणि सरकारी अधिकारी शिक्षण, पर्यावरण आणि आरोग्य सेवा या क्षेत्रातील जागतिक आव्हाने आणि नाविन्यपूर्ण उपायांवर चर्चा होणार आहे.

तसेच, शैक्षणिक पायाभूत सुविधा वाढवणे, डिजिटल साधने सादर करणे आणि वयाच्या 18 पर्यंत रोजगार क्षमता सुनिश्‍चित करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. पर्यावरणीय शाश्‍वतता आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था, टिकाऊ शहरी परिसंस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी कचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण आणि हिरव्या जागांचा विस्तार करणे याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. आरोग्यसेवा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, वैद्यकीय उपकरणांचा प्रवेश सुनिश्‍चित करणे आणि मजबूत प्राथमिक आरोग्य सेवा प्रणाली स्थापित करून शहरातील नागरिकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

Exit mobile version