| मुंबई | प्रतिनिधी |
चित्रपट सृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2023 ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहीर झाला आहे. तसेच राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2023 ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी (दि. 14) पुरस्काराची घोषणा केली. चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2023 लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2023, ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक संकलक एन. चंद्रा यांना जाहीर करण्यात आला आहे. सर्व पुरस्कार प्राप्त कलाकारांचे सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.