शेकापच्या पाठपुराव्याने विकासकामे; आ.जयंत पाटील यांचे प्रतिपादन

। वाघ्रण । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील सर्व विकासकामे ही शेकापच्याच माध्यमातून झालेली असून, वाघ्रणची नळपाणी पुरवठा योजनेसह अन्य विकासकामे माजी आम.पंडित पाटील यांच्या पाठपुराव्यानेच पूर्ण झाली असल्याचे शेकाप सरचिटणीस आम.जयंत पाटील यांनी सांगीतले. वाघ्रण ता. अलिबाग येथे नळपाणी योजनेचे लोकार्पण आणि विविध विकासकामांचा प्रारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमाला शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील, माजी आ.पंडित पाटील, जि.प.सदस्या भावना पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी जयंत पाटील हे बोलत होते. नळपाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन आ.जयंत पाटील यांच्या हस्ते फित कापून तर पंडित पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत सरपंच डॉ.प्रेरणा म्हात्रे, उपसरपंच सरोज पाटील, सदस्य हरिश्‍चंद्र पाटील, सदस्या मनिषा पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाला उपस्थित सत्यविजय पाटील, सिद्धनाथ पाटील, प्रकाश पाटील, अनिल पाटील, सुनिल म्हात्रे, अ‍ॅड.प्रमोद पाटील, संध्या पाटील, प्रमोद घासे, अमित देशपांडे, यांचे स्वागत सदस्य रूपेश पाटील, गीता पाटील, मिना म्हात्रे व क्षितिज पाटील आणि राजेंद्र पाटील, प्रमोद पाटील यांनी केले. प्रास्ताविक माजी सरपंच उदय पाटील यांनी करताना शेकापच्या माध्यमातून वाघ्रण व खारपेढांबे गावांसाठी करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. यामध्ये पंडीत पाटील यांनी केलेल्या रस्ता, शाळा दुरूस्ती, समाज मंदीर दुरूस्ती या कामांचा समावेश होता. सूत्रसंचालन ग्रा.पं.सदस्य दीपक पाटील यांनी केले.

32 विद्यार्थिनींना सायकल वाटप
शेकाप रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी वाघ्रण-खारपेढांबे गावातील 32 विद्यार्थिनींनी मोफत सायकली वाटपाची घोषणा केली. टी.व्ही. पाटील सरांनी मुलींची नावे सादर केली. प्रमुख अतिथींच्या हस्ते मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या.

शेवटी अध्यक्षीत भाषणात आ.जयंत पाटील यांनी शेतकरी कायदे मागे घेतल्यापासून वाघ्रण, मानकुळे, शहापूर, धेरडे, हाशिवरे गावांतील शेकाप जुन्या व नव्या कार्यकर्त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. दिपक पाटील यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून दयानंद म्हात्रे, प्रमोद पाटील, लहू पाटील, राजेंद्र पाटील, जयवंत पाटील, विवेक पाटील, दिपक अनंत, अविनाश म्हात्रे, संजय डेकोरेटर्स, विपुल पाटील, प्रतिक म्हात्रे, कौतुक पाटील, विजयकांत पाटील, नितिन गोरकनाथ, सारिका पाटील, संजीवनी पाटील, मनिषा म्हात्रे, दर्शना पाटील इत्यादी अनेक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Exit mobile version