अलिबाग । वार्ताहर ।
ग्रुप ग्रामपंचायत सासवणेतर्फे कोळगांव गावातील वैयक्तिक नळपाणीपुरवठा योजनेचा उद्घाटन सोहळ्याचे रविवारी (दि.23) आयोजन करण्यात आले आहे. या समारंभाला आ.जयंत पाटील, चित्रलेखा पाटील रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख, दिलीप भोईर समाज कल्याण सभापती, शंकरराव म्हात्रे जिल्हा सहचिटणीस शेकाप यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत सासवणे सरपंच व सर्व सदस्य उपस्थित राहणार आहे.