शेकाप नगरसेवकांचा विकासकामांचा धडाका

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महापालिकेतील शेकाप नगरसेवकांच्या प्रभागात विविध विकास कामांचा धडाका विरोधी पक्ष नेता प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला. नगरसेविका डॉ.सुरेखा मोहकर यांच्या फंडातून चार ठिकाणी हायमास्ट उद्घाटन करण्यात आले तसेच लिंगायत समाजाच्या स्मशानभूमी बाजूला कुंपण करण्यात आले. तसेच खांदा वसाहत च्या नगरसेविका कुसुम पाटील यांच्या फंडातून सेक्टर 6 च्या गार्डन येथे ओपन जिमच्या कामाचा शुभारभ करण्यात आला.


नगरसेविका सारिका भगत यांच्या नगरसेवक फंडातून सेक्टर 13 येथील सिडको गार्डन भूखंड ओपन जिम कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला नगरसेवक गणेश कडु, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहकर, प्रीति जॉर्ज, कुसुम पाटील, सारिका भगत, माजी नगरसेवक गणेश पाटील यांच्यासह मान्यवर ज्येष्ठ नागरिक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वच कार्यक्रमांमध्ये प्रीतम म्हात्रे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या भेट गाठी घेवून त्याची विचारपूस केली.

Exit mobile version