। रसायनी । वार्ताहर ।
पाताळगंगा औद्योगिक वसाहतीतील वडगाव ग्रामपंचायत हद्दीतील तळवली गावातील कित्येक वर्षे खोळंबलेल्या विकासकामांचे भूमिपूजन सरपंच गौरी गडगे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी तळवली गावातील भरत नामदेव मालकर यांच्या घरापासून ते बाळाराम हरी मालकर यांच्या घरापर्यंत बंदिस्त गटार ग्रामनिधीतून तयार करण्याचे काम तळवली गावातील सदस्य संदेश मालकर,मदन ठोबरे तसेच प्रकाश पवार यांच्या मागणीतून पार पडले.
भूमीपूजनप्रसंगी सरिता गडगे, कल्पना ठोबरे ,लता मालकर, संदेश मालकर, शिवाजी शिंदे, मदन ठोबरे, जयराम मालकर, नथुराम मालकर, अनंत मालकर,जगन्नाथ मालकर,पंढरीनाथ मालकर, बाळकृष्ण ठोबरे, दिनेश तुकाराम मालकर,मनोज दत्तात्रेय मालकर ,कुणाल कान्हू मालकर,अतुल मालकर आदी उपस्थित होते.