गणेशोत्सवात भाविकांना महागाईची झळ

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील नांदगावच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक देवस्थानचा माघी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, उत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या यात्रेत खरेदी करण्यासाठी आलेल्या भाविकांना वाढलेल्या महागाईला तोंड द्यावे लागले.

प्रसादासाठी घेतली जाणारी मिठाई 250 ते 550 रु. प्रती किलो, सर्वसामान्यांची भजी 300 रु. प्रतिकिलो, लहान मुलांना त्यांच्या आवडीची खेळणी शंभर रुपयांपासून पाचशेपर्यंत तसेच अन्य साहित्यही महाग मिळत असल्याने ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिकांच्या आवाक्यातील खरेदीवर निर्बंध आले होते. महिन्याची अखेर तसेच स्थानिक सुट्टीच्या अभावी सायंकाळी यात्रेला गर्दी झाली होती. सायंकाळी पालखी सोहळ्यात अनेक भाविक सहभागी झाले होते.

Exit mobile version