महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

| चिरनेर | वार्ताहर |

उरण तालुक्यातील चिरनेर महागणपती क्षेत्रात, संकष्टी चतुर्थी निमित्ताने काल सोमवारी भाविकांनी प्राचीन जागृत श्री महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला. ऐतिहासिक वारसा बरोबर चिरनेरच्या भूमीला प्राचीन देवस्थानचा परिस्पर्श झाला आहे. श्रींचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची पहाटेपासूनच सुरुवात झाली होती. माघी गणेशोत्सव येत्या 13 फेब्रुवारीला साजरा होत असल्याने, सध्या गणेश भक्त भक्तीच्या आनंदात न्हाऊन निघाले आहेत. दरम्यान गणपती देवस्थान मार्फत गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीलाही सुरुवात झाली आहे.

हार तसेच गावठी भाज्या, रानटी कंदमुळे, स्थानिक कुंभारानी बनविलेली मातीची भांडी, तसेच अन्य पदार्थांच्या विक्रीला ग्राहकांनी पसंती दर्शविल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे चिरनेर परिसरातील अनेक रहिवाशांना दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थी निमित्ताने रोजगार मिळत आहे. उरण, पनवेल, पेण, नवी मुंबई येथील भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला असल्याचे गणपती देवस्थानतर्फे सांगण्यात आले.

Exit mobile version