मराठा समाज अध्यक्षपदी धनंजय साजेकर

। राबगाव /पाली । वार्ताहर ।

सुधागड तालुका मराठा समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये पाली येथे मराठा समाज भवनातील स्व.स.स. साजेकर सभागृहात संपन्न झाली.

या सभेमध्ये धनंजय सटुराम साजेकर यांची सर्वानुमते दुसर्‍यांदा निवड करण्यात आली. या सभेत वरील कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी करिता कार्याध्यक्षपदी बळीराम विष्णू निंबाळकर, सरचिटणीसपदी सुजीत सदाशिव बारसकर व खजिनदारपदी योगेश हनुंमत मोरे या पदाधिकार्‍यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. संचालकपदी वकील गटातून नितीन मोरेश्‍वर शेवाळे यांची तर अकाऊंटंट गटातून अरविंद मारुती दंत यांची निवड करण्यात आली. समाजासाठी काम करणार्‍या महिला संचालिका म्हणून शुभदा पाटील, निहारिका शिर्के, साक्षी दिघे, समृध्दी यादव, रुपाली भणगे यांची निवड करण्यात आली.

Exit mobile version