सुधागड मराठा समाजाचा उपक्रम
| पाली | वार्ताहर |
सुधागड तालुका मराठा समाज या संस्थेच्या वतीने तालुक्यातील सर्व जाती धर्मातील महिलांसाठी सुरू केलेल्या विनामूल्य आरीवर्क प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन सोमवार, दि. 26 मे रोजी पाली येथील मराठा समाज भवनातील स्व. स.स. साजेकर सभागृहात संस्थेचे अध्यक्ष धनंजय साजेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सुधागड तालुका मराठा समाजाच्या ध्येयधोरणानुसार महिलाचे सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष धनंजय साजेकर यांच्या मार्गदर्शनाने व संस्थेच्या महिला संचालिका साक्षी दिघे व समृद्धी यादव यांच्या नेतृत्वात महिलांना रोजगार मिळावा व त्या आर्थिक सक्षम व्हाव्यात यासाठी दि. 26 ते 30 मे या कालावधीत सर्व जाती धर्मातील महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दररोज चार तासांचे असणार आहे. या प्रशिक्षणासाठी श्रद्धा चव्हाण या तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून सर्व महिला/मुलींना प्रशिक्षण देणार आहेत. या आरीवर्क प्रशिक्षणास तालुक्यातील 55 शिबिरार्थी महिलांची उपस्थिती होती.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष निंबाळकर, सरचिटणीस सुजित बारसकर, खजिनदार योगेश मोरे, ज्येष्ठ संचालक अशोक शिंदे, दिनदर्शिका समिती प्रमुख सुचिर खाडे तसेच संस्थेच्या महिला संचालिका साक्षी दिघे, समृद्धी यादव, निहारिका शिर्के व शुभदा पाटील या उपस्थित होत्या.