धर्माधिकारी महाविद्यालयास नॅककडून ‘ब’ मानांकन

। कोलाड । वार्ताहर ।

कोलाड येथील तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवे या महाविद्यालयात नॅक बेंगलोरकडून ‘ब’ मानांकन मिळाले आहे. या टीममध्ये मुख्य प्रतिनिधी म्हणून डॉ.संतोष कुमार कुमायून विद्यापीठ उत्तराखंड व प्रतिनिधी म्हणून विमल बराह प्राचार्य जी.बी.कॉलेज जराहत आसाम यांनी (दि.13) व (दि.14) मार्च या दोन दिवसात यशस्वीपणे तपासणी केली. यावेळी संस्थेचे सचिव संदीप तटकरे, अजित तेलंगे, प्रकाश सरकले, देवेंद्र चांदोरकर, डॉ.विश्‍वास देशमुख, गीता द.तटकरे, विपुल मसाळ, हजारे, अमोल गोलीपकर, डॉ. सतीश सावळे, मोहन गीतू व नेहल प्रधान आदि उपस्थित होते.

महाविद्यालयास ‘ब’ नामांकन मिळाल्याबद्दल संदीप तटकरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयास नॅकने दिलेल्या ‘ब’ नामांकनामुळे महाविद्यालयाच्या मानांकनात मानाचा तुरा खोवलेला दिसून येतो. या यशाबद्दल पंचक्रोशीतील, रायगड व कोकण आणि मुंबई विद्यापीठातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वृंद तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी विश्‍वास देशमुख व सर्व सहकार्‍यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version