धर्माजी पालकर यांचे निधन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
धर्माजी चांगू पालकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते मुळगाव रामराज सध्या रोहिदास नगर चेंढरे येथे राहत होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातून सेवानिवृत्त झाले होते सामाजिक कार्यकर्ते संतोष पालकर यांचे ते वडील होत. मृत्युसमयी त्यांचे वय 76 वर्षाचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ते कट्टर समर्थक होते त्यांचे उत्तर कार्य 20 फेब्रुवारी राहत्या घरी होणार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अ‍ॅड परेश देशमुख, चेंढरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच यतीन घरत, प्रशांत फुलगावकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version