। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
चेंढरे येथील दामोदर शंकर मोरे यांचे सोमवारी (दि. 7 ) रोजी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, जावई, भाऊ भावजय, पुतणे-पुतणी, नातवंडे, पतवंड असा माठा परिवार आहे.
कित्ते हितवर्धक भंडारी समाजाचे क्रियाशिल कार्यकर्ते संतोष मोरे यांचे ते वडिल होत. दामोदर शंकर मोरे यांनी मुंबई येथील नवशक्ती प्रेसमध्ये अनेक वर्षे सेवा केली. सेवानिवृत्ती नंतर ते अलिबाग येथे आल्यानंतर त्यांनी काही काळ प्रेस मध्ये काम केले. परिसरात ते दादा म्हणून परिचित होते.त्यांना सामाजिक कार्याची प्रचंड आवड होती. भंडारी समाजाबद्दल त्यांना खूप तळमळ होती.तसेच भंडारी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तोडणकर गुरुजी, वास्तुविशारद शशिकांत मोहिते, कित्ते भंडारी हितवर्धक समाजाचे अध्यक्ष बळवंत शिर्सेकर यांच्या त्यांचे सलोख्याचे संबंध होते. बैलगाडी शर्यतीचे ते रसिक होते. 1985 पासून बैलगाडी शर्यतीत त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. त्यांच्या निधनाने अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्यावर श्रीबाग येथील वैकुंठधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व स्थरातील नागरिक उपस्थित होते.