जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात बुधवार दि. 9 फेबु्रवारी रोजी कोरोनाच्या 117 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान आज तिन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 680 रुग्ण कोरोनामुक्त झाले अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
बुधवारी पनवेल महापालिका हद्दीत 35, पनवेल ग्रामीण 13, उरण 3, खालापूर 5, कर्जत 3, पेण 11, अलिबाग 19, मुरुड 1, माणगाव 3, 1, रोहा 7, सुधागड 1, श्रीवर्धन 12, म्हसळा 3 व महाड 1 असे 117 रुग्ण आढळले. तळा, पोलादपूर या दोन तालुक्यात आज एकही नवीन रुग्ण आढळला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 13 हजार 583 झाली आहे. यापैकी 2 लाख 7 हजार 440 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 668 वर गेला आहे. सद्यस्थितीत 1 हजार 475 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.