धावीर महाराज देवस्थानची जागा होणार आरक्षण मुक्त

नागोठणे | वार्ताहर |
श्री धावीर महाराज देवस्थानाच्या जागेवर सीमाशुल्क विभागाचे असलेले आरक्षण रद्द करण्यात आले आहे.यासाठी खा.सुनील तटकरे यांनी सीमा शुल्क विभागाशी सातत्याने पाठपुरावा करुन हे आरक्षण उठविले.
या जागेचा सीमाशुल्क विभागाद्वारे कोणत्याही प्रकारचा वापर केला गेला नाही. त्यामुळे ही जागा पुन्हा श्री धावीर महाराज देवस्थानास मिळावी, याकरिता खासदार सुनिल तटकरे यांनी सीमाशुल्क विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला व ना-हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती सीमाशुल्क विभागाला केली. त्यानुषंगाने गुरुवारी (14 ऑक्टोबर) खा.सुनिल तटकरे यांच्यासमवेत सीमाशुल्क खात्याचे आयुक्त रंजीत कुमार व इतर संबंधित अधिकार्‍यांची बैठक झाली. बैठकीत सीमाशुल्क आयुक्तांनी ही जागा पुन्हा श्री.धावीर महाराज देवस्थान ट्रस्टला देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच ही कार्यवाही पूर्ण होईल, असा विश्‍वास तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version