। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील मुद्रे येथील नवकुमार मुद्रे संघाच्या धीरज बैलमारे या तरुण कबड्डी पटूची निवड रायगड जिल्हा कुमार संघात करण्यात आली आहे.कर्जत येथील मिडलाईन क्लबचा खेळाडू असलेल्या धीरज नवकुमार मुद्रे संघाचा खेळाडू आहे. धीरज हा आक्रमक खेळाडू असून चढाईपटू म्हणून जिल्हा आणि राज्य कबड्डी स्पर्धेत सर्वोेत्तम कामगिरी केली आहे.







