‘मावळा मी शिवरायांचा’ गाण्याची धूम

अलिबागकरांच्या कलाकृतीला अनेक पुरस्कार
| भाकरवड | वार्ताहर |
अलिबागच्या कलाकारांनी मोठ्या मेहनतीने तयार केलेल्या छत्रपती शिवरायांवर आधारित 2k resolution film आणि प्रशांत म्हात्रे प्रस्तुत ‘मावळा मी शिवरायांचा’ या गाण्याला फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार मिळाले. या गाण्याला ‘तमिळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्ये सर्वोत्कृष्ट गाणं आणि सर्वोत्कृष्ट कथा हे पुरस्कार लाभले, तर कोलकाता येथे झालेल्या ‘गिफी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये गाण्याचे दिग्दर्शक विशाल गायकवाड यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला, तसेच 7 सिस्टर्स नॉर्थ ईस्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट साँग आणि सिनेमॅटोग्राफर सुनीत गुरव यांना बेस्ट सिनेमॅटोग्राफी हा पुरस्कार मिळाला.

गाण्याचे गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन प्रशांत म्हात्रे यांनीच केलं आहे. जुईली पाटील-म्हात्रे व प्रशांत म्हात्रे यांनी हे गाणं गायलं आहे. तर सुनील म्हात्रे यांनी संगीत संयोजन केलं आहे. या गाण्याचे व्हिडिओ दिग्दर्शन-संकलन विशाल गायकवाड यांनी केलं आहे आणि कथा-पटकथासुद्धा त्यांचीच आहे, तर छायाचित्रण सुनीत गुरव यांनी केलं आहे. संदीप वटवे, प्रशांत म्हात्रे, सचिन शिंदे, योगेश पवार, जुईली म्हात्रे, सई कांबळे, मंदार पाटील, गौरांगी पाटील, सुजीत पाटील, तन्वी पाटील, प्रमोद कारंडे, रसिक म्हात्रे, प्रतीक पानकर, पुनम म्हात्रे, अर्चना पाटील, अमित पाटील, सुशांत नाईक, राहुल अवचार, केतन पाटील, ऋतुराज पाटील, प्रसाद लोध, निकेत नाईक, शुभम पानपाटील, सिद्धांत पाटील, कुणाल तिर्लोतकर, हितेश पाटील अश्या अलिबागच्या अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप या गाण्यात सोडली आहे.

Exit mobile version