Diesel Smuggling: डिझेलतस्करांना तीन दिवसांची कोठडी

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रेवस जेट्टी येथील समुद्रकिनारी डिझेलची तस्करी करणाऱ्या तिघांविरोधात सोमवारी (दि.29) सकाळी कारवाई करण्यात आली. मांडवा सागरी पोलिसांच्या या कारवाईने डिझेलमाफियांना दणका मिळाला. या गुन्ह्यातील तिघांना अलिबागमधील न्यायालयात मंगळवारी (दि. 30) दुपारी हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुरवठा निरीक्षक हर्षल देशमुख यांच्या तक्रारीनुसार, मासेमारी करणाऱ्या वाघेश्वरी साई व आई गुरु माऊली या दोन बोटींद्वारे अवैधरित्या डिझेलची तस्करी करणाऱ्यांवर छापा टाकण्यात आला. पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्यासह त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. वाघेश्वर बोटीमध्ये साडेतीन हजार लीटर, आई गुरु माऊली बोटीमध्ये एक हजार 30 लिटर डिझेलचा सापडला. या कारवाई 14 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उरण तालुक्यातील करंजा येथील गजानन कोळी, अनिल कोळी आणि योगेश पाटील या तिघांना अटक केली आहे. त्यांना मंगळवारी (दि. 30) दुपारी अलिबागमधील न्यायालयात हजर केले. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भोपळे करीत आहेत.

Exit mobile version