उरण खाडीत डिझेल तस्करीतील बोट जप्त

| उरण | वार्ताहर |
डिझेलचा बेकायदा साठा असलेली एक संशयित बोट नवी मुंबई पोलिसांच्या सागरी सुरक्षा शाखेच्या हाती लागली आहे. या कारवाईत पाच लाखांचे दीड हजार लिटर डिझेल जप्त करण्यात आले असून उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. नवी मुंबई पोलिसांच्या सागरी सुरक्षा शाखेच्या पथकाला नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पहाटे तीनच्या सुमारास उरणमधील पिरकोन ते वशेणी भागात खाडीमध्ये कायबरची बोट नांगर टाकलेल्या स्थितीत आढळून आली होती.

सागरी सुरक्षा शाखेच्या पथकातील पोलिसांनी बोटीजवळ जाऊन पाहणी केली असता बोटीवर नाव अथवा कोणताही क्रमांक नसल्याचे, तसेच बोटीवर कोणीही व्यक्ती नसल्याचे त्यांना आढळून आले. यावेळी सागरी सुरक्षा शाखेच्या पथकाने केलेल्या 0तपासणीत बोटीत बेकायदा डिझेलचा साठा करुन ठेवल्याचे आढळून आले. त्यानंतर सागरी सुरक्षा शाखेच्या पथकाने खाडीमध्ये शोध घेतला. मात्र कोणीही सापडले नसल्याने बोटीमधील दीड हजार लिटर डिझेलचा साठा जप्त करुन उरण पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Exit mobile version