मोरा सागरी पोलीस ठाण्याचा उपक्रम
। उरण । वार्ताहर ।
किनार पट्टीवरील सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सागरी सुरक्षा कवच अभियान राबविण्यात आले. या अभियान अंतर्गत ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी मोरा जेट्टी येथे मुंबई येथून येणार्या बोटीतून येणार्या प्रवाशांचे सामान तपासून त्यांच्या विषयी चौकशी करण्यात आली. प्रवाशांचे ओळखपत्र व इतर माहीत घेण्यात आली. कुठलीही संशयित व्यक्ती किंवा वस्तू अथवा बोट आढळल्यास माहिती मोरा सागरी पोलीस ठाण्यास देण्यात यावी असे आवाहन मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीसनिरीक्षक अभिजित मोहिते यांनी केले.