| पनवेल | वार्ताहर |
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेच्या बाजूला अमेठी युनिर्व्हसिटीसमोर चाकूचा धाक दाखवून व मारण्याची धमकी देऊन तीन वाहनांमधून 890 लिटर डिझेलची चोरी अज्ञात चोरट्यांनी करून चोरटे पसार झाले आहेत. टेम्पो चालकाला झोप येत असल्याने टेम्पो चालकाने अमेठी युनिर्व्हसिटीसमोरील मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेच्या बाजूला टेम्पो उभा करून ठेवला. त्याठिकाणी कंटेनर, ट्रेलर अशी तीन वाहनेही पार्किंग करून ठेवली होती. अज्ञात 4 चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून व मारण्याची धमकी देत 890 लिटर डिझेलची चोरी केली. चोरी केलेल्या डिझेलची किंमत 81 हजार 880 इतकी आहे. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, अधिक तपास सपोनि गौरव इंगोले करीत आहेत.