आहार तज्ज्ञांकडून डाएटवर मार्गदर्शन

। उरण । वार्ताहर ।
भेंडखळ क्रिकेट अकॅडमी तर्फे उरण तालुक्यातील पाणदिवे येथील पुंडलिक रामा पाटील इंग्लिश हायस्कूल येथे क्रिकेटच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य आहार व आहाराच्या योग्य वेळा याबाबत मार्गदर्शनपर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिल्ली कॅपिटल या आयपीएल क्रिकेट टीमच्या आहार तज्ज्ञ सायली नाईकयांनी विदयार्थ्यांना व उपस्थित पालक वर्गांना मार्गदर्शन केले.

नेहमीच्या जेवणातील आहार व त्या आहारातून मिळणारे जीवनसत्व आयर्न, प्रोटिन, कल्शियम, फायबर, पोषक द्रव्ये कोणकोणती आहेत ? कोणत्या पदार्थापासून किती कॅलरिज मिळतात ? आदी आहाराशी संबंधित विविध विषयावर सायली नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी आणि पालकांनी विविध शंका, समस्या विचारले असता आपल्या मार्गदर्शनातून प्रश्‍नाांची, समस्यांची उत्तरे दिली. या मार्गदर्शन शिबिरातून विदयार्थी पालकांना योग्य आहार कोणता असतो, आहार कोणत्या वेळेत घ्यावा आदि गोष्टींची सविस्तर माहिती मिळाली.

यावेळी अस्थीरोग तज्ञ डॉ भूषण पाटील, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास पाटील, भेंडखळ क्रिकेट अकॅडेमीचे अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष मनोज भगत, हेड कोच नयन कट्टा, असिस्टंट कोच शरद म्हात्रे तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version