। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिगंबर जगन्नाथ नाईक यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. निधनसमयी ते 96 वर्षांचे होते. अलिबाग अर्बन बँकचे कर्मचारी तथा वाडगाव येथील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मंगेश नाईक यांचे ते वडील होत. दिगंबर नाईक यांच्या पश्चात एक मुलगा व पाच मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. दिगंबर नाईक यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंचक्रोशीतील विविध पक्षातील नेतेमंडळींनी उपस्थित राहून त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पार्थिवावर वाडगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्ष सुप्रिया पाटील यांनी नाईक कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. दिगंबर नाईक यांचा दशक्रिया विधी गुरूवार, दि. 21 जुलै रोजी, तर उत्तरकार्य रविवार, दि. 24 रोजी वाडगाव येथील राहत्या घरी होणार असल्याचे नाईक कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.