भाजप आघाडीवर; तर काँग्रेस दुसर्या क्रमाकांवर
। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. विविध पक्षांच्या, नेत्यांच्या दररोज प्रचारसभा, रॅली, मेळावे आयोजित केले जात आहेत. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांकडून डिजिटल जाहिरातींवरही भर दिला जात आहे. त्यानुसार मागील 10 दिवसांत राज्यात डिजिटल जाहिरातींवर 6.80 कोटी खर्च करण्यात आल्याचे गुगल अॅड्स ट्रान्सपरेन्सी सेंटरच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. विधानसभेचे मतदान अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपले आहे. विविध राजकीय पक्ष तसेच उमेदवारांकडून पारंपरिक प्रचारासोबतच डिजिटल जाहिरातींचाही वापर केला जात आहे.
डिजिटल माध्यमांवर व्हिडिओ, इमेज तसेच टेक्स्टद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार 1 ते 11 नोव्हेंबरपर्यंत राज्यात एकूण सहा कोटी 80 लाखांच्या डिजिटल जाहिराती प्रसारित करण्यात आल्या. त्यात भाजप पहिल्या क्रमांकावर असून काँग्रेस दुसर्या क्रमांकावर असल्याचे आकडेवारीवरून दिसते.
जाहिरातींवर राजकारण्यांची मदार
एकूण जाहिराती - 10,662
एकूण किंमत - 6,68,77,750
प्रमुख जाहिरातदार
भाजप - 3.62 कोटी
काँग्रेस - 1.52 कोटी
शिवसेना शिंदे गट - 60.4 लाख
राष्ट्रवादी अजित - 57.4 लाख
पवार गट
देवेंद्र फडणवीस - 15.3 लाख
एकनाथ शिंदे - 12.3 लाख
बारा लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी
केली जप्त
4 नोव्हेंबर - 43.5 लाख
5 नोव्हेंबर- 70.6 लाख
6 नोव्हेंबर-1.03 कोटी
नोव्हेंबर- 73.3 लाख
8 नोव्हेंबर-78 लाख
9 नोव्हेंबर-95 लाख
10 नोव्हेंबर-1.14 कोटी







