नीट परीक्षेत दिक्षाचे यश

। म्हसळा । वार्ताहर ।

नॅशनल इलींजीबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (युजी) 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दि. 4 जून रोजी लागला. त्यामध्ये म्हसळ्याची दिक्षा नितीन बोरकर हिने 720 गुणांपैकी 617 गुण मिळवून गुणवत्ता यादीत चमकण्याचा मान पटकवीला.

लहानपणापासून शिक्षणाची आवड असणार्‍या दिक्षा बोरकर हिने दहावी आणि बारावी परीक्षेतही प्रथम येण्याचा मान मिळविला. मेडिकलला जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी युजी सारखी अवघड परीक्षा देऊन गुणवत्ता यादीत आल्यास मनासारख्या महाविद्यालयात मेडिकलसाठी प्रवेश मिळणं सोपं जात. म्हसळ्यासारख्या ग्रामिण भागात कोणत्याही प्रकारच्या नीट अथवा अन्य कोणत्याही स्पर्धा परीक्षाच्या क्लासेसची सोय नसतानाही आई-वडील आणि भाऊ यांचे मार्गदर्शन घेऊन फार मोठे यश संपादन केल्याबद्दल तीचे संपूर्ण जिल्ह्यातून विशेष कौतुक होत आहे.

यावेळी सुशील यादव, नगराध्यक्ष संजय कर्णिक, समीर बनकर, गौरव पोतदार, प्रदिप कदम, महेंद्र ढवळे, भालचंद्र करडे, सुनिल अंजर्लेकर, स्वेता बोरकर, नीता बोरकर, नीता ढवळे, प्रकाश करडे, राजेंद्र बोरकर, सरपंच सुरेश महाडिक, मंगेश बोरकर, योगेश करडे, यतीन करडे, प्रतिक गोविलकर आदि मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version