| म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा हिन्दू ग्रामस्थ मंडळ आणि त्वेष्टा कासार समाज यांच्या विद्यमाने म्हसळा येथील श्री राम मंदिरात श्री राम नवमी उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासून श्री राम नवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सालाबाद प्रमाणे याही वर्षी सुषमा भावे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महादेव पाटिल, सुरेश कूडेकर, प्रसाद पोतदार, भालचंद्र करडे, भालचंद्र दातार, सुनील उमरोठकर, बाबू बनकर, महेंद्र करडे, सुशील यादव, गौरव पोतदार ,महादेव कदम, लहू तुरे, प्रतिक गोविलकर, सुजित बोरकर, हरिछंद्र गोविलकर आदि मान्यवर उपस्थित होते.