तळा शहरातील स्मशानशेडची दुरवस्था

| तळा | वार्ताहर |

तळा शहरातील रोहिदास समाज स्मशानशेडची अत्यंत दुरवस्था झाली असून, या स्मशानशेडची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. तळा तळेगाव रस्त्यावरील उजव्या बाजूस असलेल्या स्मशान शेडचे पत्रे पूर्णतः वाकलेल्या अवस्थेत असून, काही ठिकाणी पत्र्याचा भाग विखुरला गेल्याने पावसाचे सर्व पाणी हे स्मशानाच्या आत पडत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून, गावात एखादी दुःखद घटना घडल्यास येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे सदर स्मशान शेडची दुरुस्ती करण्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Exit mobile version