मोहपाड्यातील स्मशानभूमीची दुरवस्था

। आपटा । वार्ताहर ।

मोहपाडा हद्दीतील रीस नाल्याजवळील स्मशानभूमीची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. स्मशानभूमीच्या पत्र्यावरील शेड पूर्ण खराब झाली असून लोखंडी स्टँडदेखील सडले आहेत. तसेच, ज्याठिकाणीअत्यंविदी केला जातो तेथील लोखंडी फ्रेम देखील निघालेली आहे. त्याचप्रमणे पिण्याच्या पाण्याची देखील कोणतीही सोय उपलब्ध नाही. त्या ठिकाणी पाण्याची टाकी आहे, परंतु त्यात पाणी उपलब्ध नसून नळदेखील सडले आहेत. त्याचबरोबर निवारा शेडचीदेखील गरज भासत आहे. या भागामध्ये अंत्यविधीसाठी लाकडेदेखील मिळत नाहीत, त्यामुळे विद्युत शवदाहिनी चालू करावी, अशी मागणीदेखील स्थानिकांमधून होत आहे.

Exit mobile version