सोगावमधील जीर्ण विद्युत खांब बदलले

वसीम कुर यांच्या पाठपुराव्याला यश

| सोगाव | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तसेच विद्यमान सदस्य वसीम कुर यांनी महावितरणकडे पाठपुरावा केल्याने सोगाव पंचक्रोशीतील जीर्ण झालेले विद्युत खांब व तारा बदलण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. याबद्दल सर्व स्तरातून वसीम कुर यांचे कौतुक होत आहे.

सोगाव हद्दीतील बहुतांश जीर्ण झालेले विद्युत खांब व तारा खराब झाल्या होत्या, यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने महावितरण कंपनीकडे या भागातील जीर्ण झालेले विद्युत खांब व त्यावरील असणाऱ्या विद्युत वाहक तारा बदलण्याची मागणी केली होती, अशी माहिती वसीम कुर यांनी सांगितले. यापूर्वी सोगाव भागातील स्ट्रीट लाईटच्या कमी उजेडाची असणारी दिवे काढून त्याठिकाणी जास्त उजेडाची व विजेची बचत करणाऱ्या हायमॅक्स दिवे स्वखर्चाने बसवून दिले आहेत, यामुळे रात्रीच्या वेळी चांगला उजेडाचा फायदा ग्रामस्थांना होत आहे, असे वसीम कुर यांनी सांगितले.

Exit mobile version