| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
माजी आमदार स्व. मधूशेट ठाकूर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या सातिर्जे गावातील जलजिवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन आपल्या हस्ते करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर यांचे मनसुबे धुळीस मिळवत काँग्रेस नेते राजेंद्र तथा राजाभाऊ ठाकूर यांनी कार्यक्रम हायजॅक केला. या प्रकारामुळे दिलीप भोईर आणि त्यांच्या बगलबच्च्यांचे चेहरे पाहण्या सारखे झाले होते.
सातिर्जे गावामध्ये केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने जल जीवन मिशन योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना सातिर्जे गावात येण्यासाठी माजी आमदार स्व. मधूशेठ ठाकूर उर्फ पप्पा हयातीत असताना पपांच्या माध्यमातून काका ठाकूर यांनी पत्रव्यवहार करून योजना मंजूर होण्यासाठी प्रयत्न केलेला होता.
असे असताना या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत दिलीप भोईर यांनी ह्या योजनेचा भुमीपूजन सोहळा सर्व प्रोटोकॉल तोडत आपल्या हस्ते करण्याचा घाट सरपंचाच्या करवी घातला होता. मात्र ही गोष्ट काँग्रेस नेते राजेंद्र तथा राजाभाऊ ठाकूर यांना समजताच त्यांनी वेगाने चित्र बदलवत कार्यक्रमच हायजॅक केला. त्यामुळे या कार्यक्रमाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र तथा काका ठाकूर यांच्या हस्ते पार पडला. सर्व सूत्र आपल्या हातात घेत राजाभाऊ ठाकूर यांनी एकच दगडात अनेक पक्षी मारले.
या कार्यक्रमाला माजी जि.प.सदस्य दिलीप भोईर, माजी जि.प.सदस्या रविना रवींद्र ठाकूर, तसेच रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, सरपंच सौ.प्राजक्ता खडपे, उपसरपंच उमेश ठाकूर, माजी सरपंच प्राची ठाकूर तसेच सातिर्जे ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य तसेच ग्रामस्थांमध्ये उपस्थित होते.