अजित पवार गटाचे दिलीप वळसे शरद पवारांच्या भेटीला

| मुंबई | प्रतिनिधी |
राष्ट्रवादीचे अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर त्यांनी वेगळा गट तयार केला. यावेळी शरद पवार यांचे विश्वासू दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांना साथ दिली. त्यानंतर अनेकदा त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. असे असताना आता दिलीप वळसे पाटील शुक्रवारी शरद पवार यांच्या भेटीला गेले असल्याने राजकिय वर्तूळात चर्चा सुरु झाली आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी भेटीनंतर माध्यमांना माहिती दिली. या बैठकीत कुठली ही राजकीय चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच आपण पवार साहेबांचे मार्गदर्शन नेहमी घेत असतो, असे दिलीप वळसे यांनी म्हटले.

रयत शिक्षण संस्थेतील अनेक मुख्य पदांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दिलीप वळसे पाटील हे अजित पवार गटाचे नेते अजूनही रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारिणीत आहेत. यामुळे रयत शिक्षण संस्थेची कार्यकारणी बदलण्याची चर्चा होती. परंतु असे काहीच झाले नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले.

Exit mobile version