नाना पाटेकरांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

। मुंबई । वार्ताहर ।
रसिकांच्या मनावर गेली अनेक दशके अधिराज्य गाजविणार्‍या नाना पाटेकर यांना नुकताच मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्यासह संगीत, नाटक, कला आणि सामाजिक कार्यामध्ये धडाडीनं काम करणार्‍या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला.
विलेपार्ल्यातील एका सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये दीनानाथ मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना प्रदान करण्यात आला. तसेच उषा मंगेशकर यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी दीनानाथ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. याबरोबरच मीना मंगेशकर यांना आणि सिनेमा क्षेत्रातील योगदानासाठी प्रेम चोप्रा यांनाही गौरविण्यात आले.
पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी खासदार आणि संपादक संजय राऊत यांनाही सन्मानित करण्यात आले. साहित्य क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणार्‍या संतोष आनंद यांना वाग्विलासिनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबरोबरच कवयित्री नीरजा, डॉ.प्रतीत समदानी, डॉ.राजीव शर्मा, डॉ.जनार्दन निंबोळकर, डॉ.अश्‍विन मेहता, यांनाही यावेळी गौरविण्यात आले.

Exit mobile version